झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेने अवघ्या कमी कालावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहे. त्यामुळे प्रेक्षक येणाऱ्या प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पाहत असतात. सई आणि आदित्यची केमेस्ट्री सगळ्यांनाच खुप आवडते. आणि आता सई आणि आदित्यच्या नात्यात जरा एक वेगळ वळण आलं आहे. २७ नोव्हेंबेरच्या भागात आदित्य सईसमोर प्रेमाची कबुली देणार असल्याचं दिसून येतय.
ह्या मालिकेत दोघांनचही नातं अगदी सुंदर दाखवल आहे. परंतु हे नक्की नातं कसलं आहे. हे आदित्यला उलगडत नाहीये. आपण मित्र आहोत की आपल्यात प्रेमभावना आहे. याच प्रश्नात आदित्य अडकला होता. परंतु त्याला आता प्रेमाची जाणीव झाली असून येणाऱ्या पुढील भागात तो सईसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. पण आदित्य ह्या भावना सईपर्यंत पोहोचतील का ती त्याला होकार देईल का? की त्यांच्या नात्यात दुरावा वाढेल? हे आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच.
Title: Aditya and Sai Lovestory will start soon