तमन्ना भाटियाने कावलामध्ये तिच्या अफलातून डान्स ने जिंकली प्रेक्षकांची मन !

सध्या बी टाऊन मध्ये जीची चर्चा आहे अशी अभिनेत्री तमन्ना भाटिया ! तिच्या बॅक टू बॅक अफलातून प्रोजेक्ट्स मुळे ती चर्चेत आहेत. अलीकडेच तिच्या अ‍ॅमेझॉन प्राइमवरील जी करदा आणि नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज 2 या हिंदी रिलीज अद्भुत यशा नंतर अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि याच कारण तितकच खास आहे तमिळ चित्रपट जेलर मधला ” कावला ” डान्स ने प्रेक्षकांची मन जिंकली. 6 जुलै रोजी हा बहुचर्चित गाण्याची झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. तमन्ना या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिग्गज अभिनेते रजनीकांतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

व्हायरल झालेला संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि दिग्दर्शक नेल्सन यांच हे गाणं लाँच झालं असून एका खास प्रोमो मधून हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कावलाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तमन्ना भाटियाने तिच्या अफलातून डान्स मूव्ह्सने स्क्रीन वर एक वेगळी मज्जा आणली आहे. जेलर मधल्या गाण्याच्या आकर्षक ट्यूनमध्ये प्रेक्षक गुंतले आहेत. ती कावलामध्ये दिसते तशी ती कधीच आकर्षक आणि मोहक दिसली नाही आणि म्युझिक व्हिडिओमध्ये तिचं सौंदर्य अजून खुलले आहे.

तमन्ना भाटिया तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रत्येक प्रकल्पांच्या यशाने ती सध्या टॉप लिस्ट वर आहे. कावलाच्या रिलीजसह प्रेक्षकांचे अपार प्रेम तिला मिळत आहे. जेलर व्यतिरिक्त तिच्याकडे मल्याळममध्ये बांद्रा आणि तेलुगुमध्ये भोला शंकर हे चित्रपट असून तमिळमध्ये अरनामनाई 4 हा एक मोठा चित्रपट ती करणार आहे.

Leave a Comment