नॅशनल अवॉर्ड जिंकणारा मराठी चित्रपट म्हणजे गोष्ट एका पैठणीची. गोष्ट एका पैठणीची चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली संजीव सध्या पॉलिटिकल सायन्स या विषयाचा अभ्यास करत आहे. सायली राज्यशास्त्र या विषयामधून मास्टर्स करत आहे. तिच्या मास्टर्सची सध्या परीक्षा चालू आहे. याची माहिती स्वतः सायलीने सोशल मीडिया द्वारे दिली आहे. फोटो शेअर करत सायलीने कॅप्शन मध्ये लिहिले आहे, Never Stop Learning. सायलीने लिहितानाचा फोटो पोस्ट केला आहे.
काहे दिया परदेस या मालिकेतून सायलीला एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली होती. या मालिकेमुळे शिव आणि गौरी हे पात्र घराघरांत पोहचलं होतं. काहे दिया परदेस मालिकेतून सायलीला खूपच लोकप्रियता मिळाली होती. छोट्या पडद्यानंतर सायलीने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. मन फकिरा, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची अशा चित्रपटामध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
सायलीचे चाहते खूपच कौतुक करत आहेत. ती अभिनयासोबत अभ्यास देखील करत आहे. शिकायचं थांबवू नका, हा तिचा मेसेज सर्वानाच आवडला आहे. राज्यशास्त्र विषयात ती मास्टर्स करत आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे, आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

