सध्या बरेच कलाकार विवाह बंधनात अडकले आहेत. नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे विवाह बंधनात अडकला आहे. आता कारभारी लय भारी या मालिकेमधील शोना म्हणजेच अभिनेत्री रश्मी पाटील विवाह बंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून तिने तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी कळवली आहे. रश्मीने वचन दिले तू मला या मालिकेत निहारिका ही भूमिका साकारली होती. त्याचबरोबर झी मराठीवरील कारभारी लय भारी मध्ये शोना आणि मी मराठीवरील प्राजक्ता या मालिकेत रेणु या नावाची भूमिका साकारली होती.
गेल्या काहीदिवसांपूर्वी तिचा साखरपुडा पार पडला होता. २१ मे , रविवारी तिचा विवाह पार पडला. त्या अगोदर तिची मेहंदी सेरेमनी , हळदी सेरेमनी पार पडली. तिने मेहंदीचे फोटो पोस्ट करून आपल्या हातावर तिच्या नवऱ्याचे नाव लिहिले आहे. अक्षय असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे. रश्मीने खुप सुंदर अशी मेहंदी आपल्या हातावर काढली आहे. तिने मेहंदीला पिच कलरचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खुप सुंदर दिसत होती.
रश्मीने तिच्या हळदीला पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तिच्या नवऱ्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोघेही हळदीच्या जोड्यामध्ये खुप सुंदर दिसत होते. योगेंद्र चव्हाण या फोटोग्राफरने या जोडप्याचे सुंदर असे फोटो काढले आहेत.
रश्मीने तिच्या लग्नाची पोस्ट करत Officially “Mr” and “Mrs”. असे कॅप्शन लिहीत #justmarried म्हणून लिहिले आहे. चाहत्यांनी आणि बऱ्याच कलाकारांनी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रश्मीने लग्नाला खास लेहंगा परिधान केला होता. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि केसांमध्ये लाल सिंदूर अशा लुक मध्ये रश्मी खूपच गोड दिसत होती. खुप छान असं हे कपल दिसत आहे.
रश्मी आणि अक्षयची जोडी तुम्हाला कशी वाटली ? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा