छोट्या पडद्यावरील अभिनेत्री राधा सागर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. ती तिच्या फॅन्सशी नेहमीच चांगल्या गोष्टी शेअर करत असते. तिने तिच्या चाहत्यांना एका आठवड्याअगोदर काहीतरी खास ते पण लवकरच असे कॅप्शन लिहीत कळवले होते. आज राधा सागर हिचा वाढदिवस आहे. कुणीतरी येणार गं .. आजचा दिवस हा सर्वात चांगला दिवस आहे, असं म्हणून राधाने पोस्ट करत विडियो शेअर केला आहे.
विडियोमध्ये राधाने पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केला असून, तिच्या नवऱ्याने जांभळ्या कलरचा शर्ट परिधान केला आहे. तिचा नवरा सागर कुलकर्णी यानेही छान पोज देत आपल्या बायकोसोबत फोटो आणि मस्त विडियो काढले आहेत. दोघेही खूपच छान दिसत आहेत. राधाने बेबी बंप दाखवत मस्त असे फोटोशूट केले आहेत. राधा पहिल्यापेक्षा खूपच सुंदर दिसत आहेत. प्रेग्णंन्सी मुळे राधाच्या चेहऱ्यावरती खूपच ग्लो आला आहे. Mommy To Be खूपच सुंदर दिसत आहे.
राधाने आई कुठे काय करते या मालिकेत अंकिता नावाची तर सुंदरा मनामध्ये या मालिकेत अभिलाषा नावाची भूमिका साकारली होती. यामुळे राधाला खूपच लोकप्रियता मिळाली होती. तसेच तिने मलाल या हिंदी आणि चंद्रमुखी या मराठी सिनेमात देखील काम केले आहे.
चाहत्यांनी दोघांवरती शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच होणाऱ्या बाळासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेक्षक आणि चाहते खूपच खुश आहेत. राधाच्या या गोड बातमीने चाहते खूपच खुश आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांनी राधा आणि सागरला खुप शुभेच्छा दिल्या आहेत.