मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही महिन्यांपूर्वी बऱ्याच कलाकारांनी स्वतःचे फार्महाऊस तर कोणी घर विकत घेतले आहे. स्वतःचे घर खरेदी करणे हे सर्वांचे स्वप्न असते. आता एका अभिनेत्रीने मुंबईमध्ये स्वतःचे घर खरेदी केले आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकरने स्वतःचे घर घेतले आहे. याची माहिती स्वतः धनश्रीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. सई ताम्हणकर, राधा सागर, मीरा जोशी, स्मिता शेवाळे आणि रुतूजा बागवे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःचे घर घेतले आहे.
धनश्रीने सोशल मीडियावर छान अशी पोस्ट करत चाहत्यांसोबत आपला आनंद शेअर केला आहे. New home …. ‘स्वप्नं खरी होतात’. असे कॅप्शन धनश्रीने पोस्टला दिले आहे. मुलाचा आणि तिचा नवरा दुरवेश देशमुख यांचे फोटो देखील धनश्रीने शेअर केले आहेत. यावर चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेन्ट करत धनश्रीला खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
धनश्री सध्या झी मराठीवरील तू चाल पुढ या मालिकेत शिल्पी नावाची खलनायिकेची भूमिका साकारत आहे. प्रेक्षक तिच्या या पात्राला खुप प्रेम देत आहेत. तू चाल पुढं या मालिकेमुळे तिला पुण्याहून मुंबईमध्ये शिफ्ट व्हावं लागलं. तिचा २ वर्षाचा मुलाचा विचार तिला करावा लागला. आता धनश्रीचे स्वतःचे घर मुंबईमध्ये झाले आहे.
atoz मराठीकडून धनश्री काडगावकरला खुप साऱ्या शुभेच्छा.


