लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक झाला आहे. अंकीताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन १२ ऑगस्ट, शनिवारी झाले आहे. मुंबईत त्यांचे निधन झाले असून, लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शशिकांत लोखंडे यांच्या निधनाचे कारण अद्याप कळले नाही. आज रविवारी सकाळी ११:०० वा. ओशीवारा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंकिता लोखंडे तिच्या वडीलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करायची. तिच्या वडिलांवर तिचे जीवापाड प्रेम होते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली अंकिता हिला अॅक्टिंगसाठी तिच्या आई वडिलांनी खुप पाठिंबा दिला. बऱ्याच मुलाखतीमध्ये अंकिता तिच्या आई वडिलांबद्दल असलेलं प्रेम आणि त्यांचा अंकिताला असलेला सपोर्ट या बद्दल नेहमीच बोलली.
अंकीताचे वडील एक बँकर होते. काही दिवसांपूर्वी अंकिताने फादर्स डे निमित्त वडिलांना शुभेच्छा दिल्या होत्या. अंकिताने तिच्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आहे. बरेच कलाकार अंकिताच्या वाडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. वडिलांच्या जाण्याने अंकिताला मोठा धक्का बसला आहे. शशिकांत लोखंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




