शुभमंगल ऑनलाइन या मालिकेतील शंतनुचे पडद्यावरील लग्न नुकतेच पार पडले आता त्याने खऱ्या आयुष्यात देखील लवकरच लग्न करण्याचे मनावर घेतले आहे. कारण नुकताच सुयशचा साखरपुडा पार पडलाय. सुयश टिळकने अगदी छान मुहूर्त साधत आयूषी भावे सोबत साखरपुडा केलाय.
आयूषीच्या वाढदिवसाच निमित्त साधत दोघांनी ही आनंदाची बातमी पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितली आहे. सुयशने लिहिल एक अशी स्त्री ही माझ्या आयुष्यात सगळच सुंदर बनवते .. हॅप्पी बर्थडे लव तुझ्यासोबत माझं आयुष्य पूर्णत्वास गेलं आहे आणि तुझ्या सारखी लाइफ पार्टनर मिळणं मी माझं भाग्य समजतो … तुमच्यासोबत हे शेअर करायला आनंद होतं आहे की आमचा साखरपुडा पार पडला आहे आणि आमचा नविन प्रवास सुरू करत आहोत .
तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादसोबत .. सगळया कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराचे आभार आमच्यासाठी सगळं खास करण्यासाठी . तर आयुषीने लिहिलय He said haapy birthday . I said Yes.
सुयश आणि आयुषीच्या सिनेसृष्टीतल्या मित्रपरिवाराने देखील खास पोस्ट शेअर करत दोघांचे अभिनंदन तर आयुषीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर तुम्हाला सुयश आणि आयुषीची जोडी कशी वाटली हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.