प्रोफेसर सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 ! अभिनेता सोनू सूद याने आईच्या स्मरणार्थ सुरू केली खास शिष्यवृत्ती !

2022 मधल्या अनोख्या यशा नंतर ” प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 नुकतीच लाँच करण्यात आली. ” सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) अंतर्गत प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 ही खास शिष्यवृत्ती पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे. ही खास शिष्यवृत्ती अभिनेता सोनू सूदची यांची आई सरोज सूद यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेता सोनू सूद ने त्याच्या निःस्वार्थ मदतीने महामारीच्या काळात “मसीहा” ही पदवी मिळवली आहे. लोकांना मदत करण्यासाठी कायम तत्पर असलेला बेघरांना आश्रय देणारा , गरजूंसाठी एअरलिफ्टचे आयोजन करणारा सामान्य माणसाच्या सेवेसाठी कायम तत्पर असलेला हा अभिनेता ! त्याच्या या अथांग समाजसेवेसाठी तो ओळखला जातो पण कायम लोकासाठी अभिनेत्या पलिकडे जाऊन तो एक समाजसेवक बनतो. त्याच्या या अनोख्या कामा मुळे तो नेहमीच एक अमिट छाप सोडून जातो.

‘ प्रो. सरोज सूद शिष्यवृत्ती 2023’ ही खास शिष्यवृत्ती मोहीम पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींद्वारे दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. सोनू सूद चॅरिटी फाउंडेशन त्यांच्या उच्च शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा अनोखा हात आहे.

पदवीपूर्व आणि पदव्युत्तर या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करून आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. सोनू सूदने “पढाई आपकी, झिम्मेदारी हमारी” या अनोख्या विचार शैली ने ही अनोखी मोहीम सुरू केली आहे.

सूद चॅरिटी फाउंडेशन (SCF) ने देश भगत युनिव्हर्सिटी आणि बुधा कॉलेजसोबत भागीदारी स्थापित केली आहे ज्यामध्ये ते पात्र उमेदवारांसाठी विविध शिष्यवृत्तीच्या जागा देतात. अर्जदारांनी त्यांच्या अटी व शर्तींनुसार विद्यापीठाने निश्चित केलेले निवड निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘प्रा. सरोज सूद शिष्यवृत्ती 2023’ साठी अर्ज एससीएफच्या अधिकृत वेबसाइटवर फॉर्म भरून सबमिट करू शकतात.

Leave a Comment