अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची ओळख मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना अशी होती. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला असून, गेल्या 7, 8 महिन्यांपासून ते एकटेच राहत होते.
शुक्रवारी शेजाऱ्यांनी रविंद्र महाजनी यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी रविंद्र महाजनी यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडला. तेव्हा पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळला. रविंद्र महाजनी यांचा मृत्यू दोन, तीन दिवसांपूर्वी झाला असावा, अस अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला पोलिसांनी पूर्ण माहिती दिली आहे. तो मुंबईत राहत असल्याने, आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच तो पुण्यात दाखल झाला आहे. रविंद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिस शवविच्छेदनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी याच्याकडे सोपवणार आहेत. आज शनिवारी त्यांच्यावर तळेगाव ग्रामीण रुग्णालयात अंत्यसंस्कार होणार आहेत.
झुंज, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट खुप गाजले. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. गश्मीर सोबत त्यांनी पानिपत हा चित्रपट केला होता. पानिपत हा चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे.
रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. बरेच काळकर अंत्यसंस्कारासाठी पुणे येथे पोहचले आहेत. गशमीर आपल्या आईला सावरताना दिसतोय. खुप साऱ्या कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रध्द्धांजली दिली आहे.