आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन! मराठी सिनेसृष्टीत शोककळा!

कालच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला असून, आज आणखी एका अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेते मिलिंद सफई यांचे आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० :४५ वाजता निधन झाले आहे. मिलिंद सफई यांना कॅन्सरचं निदान झाले होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नुकतेच मिलिंद सफई यांनी सोनी मराठीवरील आशिर्वाद तुझा एकवीरा आई या मालिकेत मोचण महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेत काम केले होते. अरूंधतीच्या वडिलांच्या भूमिकेत ते आपल्याला दिसले होते. त्यांच्या सहकलाकारांनी आणि मराठी सिनेसृष्टीतिल कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. त्यांनी मेकअप, थॅंक यू विठ्ठला, पोस्टर बॉइज, छडी लागे छम छम, प्रेमाची गोष्ट, टार्गेट, लकडाऊन अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. सांग तू आहेस का? १०० डेज, पुढचं पाऊल या मालिकांमध्ये मिलिंद सफई यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

त्यांनी मराठी मालिकांमध्ये वडिलांच्या भूमिका साकारल्या असून, मराठी मालिकेतला बाप हरपल्यासारखं प्रेक्षकांना देखील वाटतंय. मराठी कलाकारांनी त्यांच्या आठवनिंना उजाळा देत, भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Comment