अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या आईचे दुख:द निधन

मराठी चित्रपट,नाटक,मालिका यांमधील दिग्गज कलाकार असलेले अभिनेते गिरीश ओक हे आपल्याला आता ‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकेत अभिजीत राजेंची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांच्या आईचे नुकतेच निधन झाले ही बातमी त्यांनी स्वतः त्यांच्या फेसबूक पेजवर शेअर करत सांगितली.. दुसऱ्या कोणाचंतरी सांत्वन करण्यासाठी लिहिलेली कविता आज माझं सांत्वन करायला धावून आली , असं त्यांनी पोस्ट मद्धे लिहिलं आहे. त्यांनी त्यांच्या आईसोबतच्या आठवणींना उजाळा देत एक कविता लिहिली. त्यांनी त्या पोस्ट मद्धे म्हंटलय की “सौ शशीकला रत्नाकर ओक”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं तरी सांत्वन करण्यासाठी मीच केलेली ही कविता माझंच सांत्वन करायला धावून आली आणि माझ्यात सकारात्मकता भरून गेली.

—————————

” इथला धीर पुरेनासा होतो

इथलं औषध लागेनासं होतं

इथली हवा मानवेनाशी होते

मग जगण्याची इच्छाच नाहीशी होते

बट डोन्ट से द पेशंट ईझ डेड

बट द पेशंट ईझ ट्रान्सफर्ड टू सूपर आय सी यू

तिथला धीर खोटा खोटा नसतो

अमृत फार्मास्युटिकल्सच्या औषधांमधे भेसळ नसते

अहो क्वॅालिटी कंट्रोल बोर्डावर चक्क अश्विनी कुमार बसलेले असतात नं !

आणि हवं नको ते बघायला मुलं नातवंडं नाही तर चक्क आई बाबा आजी आजोबा खापर खापर सगळेच

तिथल्या हवेत पोल्यूशन नसतं

सगळंच कसं इथल्या पेक्षा अपग्रेडेड असतं

तिथे जगण्या साठी शरीराची गरजच नसते

मग ते थकलं काय नी नसलं काय

फक्त इथल्या आय सी यू च्या दाराच्या काचेतून तुम्ही पेशंटला बघू शकतात हेल्पलेसपणे

ती सोय (?) सूपर आय सी यू ला नाही

पण काळजी करू नका

केस आता

खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात आहे

सो डोन्ट वरी “

—————————

“आई” तू आमच्या समोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला.

दुर्गा पल्लवी गिरीश

अशा शब्दात त्यांनी आई विषयी लिहलय. डॉ. गिरीश ओक यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Comment