Abhijit Sawant on Ankita : तिला या पुढं माझी भेटण्याची इच्छा नाही, समोरच्याला खाली.. अभिजित सावंतने अंकिता बद्दल स्पष्ठ केलं आपलं मत!

Abhijit Sawant on Ankita : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचं समारोप झालं असला तरी या शोची चर्चा अजूनही थांबलेली नाही. या सीझनमध्ये सूरज चव्हाणने विजेतेपद पटकावलं, तर अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर आला. अभिजीतला जिंकता आलं नसलं तरी त्याचे चाहते त्याला खूप पाठिंबा देत आहेत. “आमच्या मनाचा विजेता तूच आहेस,” अशा प्रतिक्रिया अभिजीतला अनेक ठिकाणी मिळत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Abhijit Sawant on Ankita
Abhijit Sawant on Ankita

बिग बॉसच्या प्रवासात अभिजीत सावंत नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिला. त्याने खेळामध्ये कधीही आपली सीमा ओलांडली नाही, कोणाशीही वाद घातला नाही, शिवीगाळ केली नाही, किंवा कोणत्याही प्रकारची आक्रमकता दाखवली नाही. यामुळे त्याचं कौतुक होत राहिलं. त्याच्या संयमी आणि सुसंस्कृत वागण्यामुळे त्याने खूप चाहत्यांची मने जिंकली.

Free Mobile Phone : महाराष्ट्रातील या महिलांना मिळणार सरकारकडून मोफत मोबाईल फ़ोन..

अभिजीतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिग बॉसच्या घरातील त्याच्या अनुभवांबद्दल आणि त्याच्या आगामी योजनांबद्दल मोकळेपणाने बोललं. या मुलाखतीत त्याने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. विशेषतः घरातील स्पर्धक अंकिता वालावलकर हिच्याबद्दल त्याने एक महत्त्वाचं विधान केलं. अभिजीत म्हणाला की, त्याला आता अंकिताला पुन्हा भेटण्याची इच्छा नाही.

अभिजीत आणि अंकिता दोघेही बिग बॉसच्या घरातील टीम बीचे स्पर्धक होते. शोच्या सुरुवातीला त्यांच्या मैत्रीत काहीच अडचण नव्हती, पण ती मैत्री कधीच खूप घट्ट झाली नाही. विशेषतः अभिजीत आणि निक्कीची मैत्री अंकिताला फारशी आवडली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात काही तणाव दिसून आला. शोच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये, अभिजीतने घेतलेल्या काही निर्णयांवर अंकिताने नाराजी व्यक्त केली होती. याच्यामुळे दोघांमध्ये काही वादही झाले, ज्याचं पडसाद घराबाहेरही उमटले.

Gunratne Sadavarte :हाय कोर्टाचा आदेश..गुणरत्ने सदावर्ते बिग बॉस च्या घराबाहेर.. काय आहे कारण

या सगळ्या परिस्थितीवर अभिजीतने आता त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याने सांगितलं की, अंकिताने तिच्या गेममध्ये काही सुधारणा केल्या असत्या, तर ते दोघं कदाचित समोरासमोर काही गोष्टींवर चर्चा करू शकले असते. मागे बोलण्याऐवजी थेट तोंडावर बोलणं कधीही चांगलं असतं, असं त्याचं मत होतं. मात्र, त्याच्या मनात आता अंकिताबद्दल काही राग किंवा वैर नाही, पण त्याला तिला पुन्हा भेटण्याची इच्छा मात्र नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.

Raj Thakre and Ankita : अंकिताच्या लग्नाच पहिलं आमंत्रण ‘राज ठाकरे ‘ यांना .. अंकिताने सांगितली भावनिक गोष्ट..

अभिजीत सावंतचा हा मोकळेपणाने दिलेला प्रतिसाद त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याच्या संयमी स्वभावामुळेच त्याला प्रेक्षकांचा एवढा पाठिंबा मिळाला आहे. आता त्याच्या पुढील योजनांबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, अभिजीतने बिग बॉसच्या घरात आपली वेगळी छाप सोडली आहे.

Leave a Comment