प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार स्टार प्रवाह वरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नव्या मालिकेत..

स्टार प्रवाह वरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. या स्टार प्रवाहच्या परिवारात नेहमीच नविन मालिकांच कुटुंब सामील होत असतं. २ मे पासुन ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नविन मालिकेच कुटुंब या परिवारात सामील होणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे मुख्य भुमिकेत दिसणार आहे. तब्बल १२ वर्षांनी अभिनेत्री उर्मिला कोठारेने या मालिकेतून कमबॅक केला आहे . तर या मालिकेत बालकलाकाराची मुख्य भूमिका अवनी तायवाडे साकारणार आहे. अवनींने याआधी ‘स्टोरी ९ मंथ की’ आणि ‘ये है चाहते’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. मुख्य भूमिका असलेली ही तिची पहिलीच मराठी मालिका आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या मालिकेचे २ प्रोमो प्रेक्षकांना पहिला मिळाले यावरून स्वरा म्हणजेच अवनीचे वडील कोण असतील याकडे सगळ्यांच लक्ष आहे. या मालिकेत स्वराच्या वडिलांच्या भुमिकेत दुसर तिसर कोणी नसून अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. याआधी अभिजीत ला आपण अनेक मालिकांमध्ये पहिल परंतु ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील गुरुनाथ सुभेदार म्हणजेच गॅरी हे पात्र घराघरात पोहोचल.

तर तुम्ही अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी पाहायला उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment