रंग माझा वेगळा मालिका नवीन वळणावर!

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेचं कथानक अतिशय रंजकदार वळणावर येऊन पोहोचलं आहे. नाशिकमध्ये कार्तिकचा ऍक्सिडंट होतो. दीपा कार्तिकला घेऊन हॉस्पिटल मध्ये येते. सौंदर्या पोलिसांना घेऊन हॉस्पिटल मध्ये येते. रागामध्ये सौंदर्या दीपाच्या कानाखाली मारते. आणि पुह्ना तिला कार्तिकला भेटण्यासाठी मनाई करते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

परंतु या मालिकेत आपल्याला एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे अभिज्ञा भावे. रंग माझा वेगळा या मालिकेत अभिज्ञा, डॉक्टर तनुजा भारद्वाज या भूमिकेत दिसत आहे. अभिज्ञाच्या एन्ट्रीमुळे रंग माझा वेगळा मालिका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. कार्तिकच्या असिसिडेन्ट नंतर डॉक्टर तनुजा कार्तिकचे ऑपेरेशन यशस्वी पणे पाडते. डॉक्टर तनुजा आणि कार्तिक यांची जुनी ओळख असते. ते दोघे कॉलेज फ्रेंड्स होते. कॉलेज नंतर प्रथमच त्यांची हॉस्पिटल मध्ये भेट होते. आता या मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार याची सर्वानाच उत्सुकता आहे.     

Tags : Rang Maza Vegala New Twist, Abhidnya Bhave entry in rang maza vegala          

Leave a Comment