अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा साखरपुडा संपन्न

रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकून घेतला आहे. अभिज्ञाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मेहुल पै असे आहे. काही दिवसांपूर्वीच अभिज्ञाने आपण प्रेमात असल्याची कबुली दिली होती. आत्ता तिने तिच्या एंगेजमेंट चे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेयर केले आहेत. मराठी कलाकार आणि चाहते अभिज्ञावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लवकरच अभिज्ञा आणि मेहुल विवाह बंधनात अडकणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिज्ञाचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न वरुण वैतीकर यांच्याशी झाले होते. परंतु त्यांचे हे नाते खूप काळ टिकू शकले नाही. पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर अभिज्ञा मेहुल पै यांना डेट करत होती. आत्ता त्यांचा साखरपुडा पार पडला असून लवकर ते दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. तर मित्रांनो अभिज्ञा भावे आणि मेहुल यांची जोडी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Abhidnya Bhave engagement, abhidnya bhave wedding, abhidnya bhave sakharpuda, अभिज्ञा भावे साखरपुडा

Leave a Comment