” तनु वेड्स मनु ते रक्षाबंधन ” दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा कामाचा अनोख्या आढावा !

प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते आनंद एल राय त्यांच्या अनोख्या कथाकथनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. 28 जून रोजी या म्हणजे आज या दिग्गज दिग्दर्शकांचा वाढदिवस साजरा करताना जरा त्यांच्या ” सिनेमॅटिक अनुभवा ” बद्दल जाणून घेऊ या !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तनु वेड्स मनु
एक आनंददायी रोमँटिक कॉमेडी चित्रपट म्हणजे ” तनु वेड्स मनू ” ! या चित्रपटाने आनंद एल राय यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्दर्शक म्हणून नवीन ओळख संपादन केली. आर. माधवन आणि कंगना राणौत यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका अपारंपरिक प्रेमाच्या ट्रँगल बद्दल ची खास गोष्ट सांगतो. विनोदी संवाद , हटके पात्र आणि आकर्षक गाणी आणि यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.

तनु वेड्स मनु: रिटर्न्स
सुपरहिट ठरलेल्या पहिल्या चित्रपटा नंतर ” तनु वेड्स मनू ” चा सिक्वेल आला आणि यातून अजून एका कथेने जन्म घेतला. आनंद एल राय यांनी पुन्हा एकदा तनु वेड्स मनू: रिटर्न्स च तितक्याच मनापासून आणि मनोरंजक पने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि या चित्रपटाचा दुसरा भाग देखील तितकाच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केले.

न्यूटन
दिग्दर्शक निर्माते आनंद एल राय निर्मित न्यूटनने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक वेगळीच छाप पाडली. न्यूटन ने 90 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी भारतासाठी अधिकृत पने हा चित्रपट निवडला गेला होता.

तुंबाड
निर्माता या नात्याने आनंद एल राय यांनी तुंबाड हा अनोखा चित्रपट निर्माण केला. एक हॉरर कथा प्रेक्षकांना दिली. राही अनिल बर्वे दिग्दर्शित हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर गेला यात शंका नाही. मनमोहक कथा असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि याच अनोखं कौतुक झालं.

रांझणा
आनंद एल राय दिग्दर्शित असलेला हा मास्टर पिस सिनेमा ! वाराणसीमधील एक मार्मिक प्रेमकथा दाखवताना आनंद एल राय यांनी या चित्रपटात साऊथ सुपर स्टार धनुष ला मुख्य भूमिकेसाठी घेतलं होत सोबतीला सोनम कपूर देखील या चित्रपटात दिसते. भावपूर्ण संगीत, दमदार परफॉर्मन्स आणि बारीकसारीक कथाकथनाने या सिनेमाने देशभरातील प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं.

Leave a Comment