स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने एक वेगळं वळण घेतलं आहे. अभिने अनघा सोबत लग्न न करता अंकितासोबत लग्न केल्यामुळे प्रेक्षक भडकले आहेत. प्रेक्षक अभिवर फारच संतापले आहेत. आणि याच संदर्भात अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे . त्यांनी त्या पोस्ट मद्धे म्हंटल आहे की, निरंजन कुलकर्णी म्हणजेच “आई कुठे काय करते” चा डॉक्टर अभिषेक देशमुख ,सध्या अंकिताशी लग्न करून आल्यामुळे असंख्य लोकं अभिषेक देशमुखला अक्षरशा शिव्या घालता आहेत, काल रात्री त्यांनी मला insta पोस्टवर लोकांनी ज्या शिव्या दिल्या त्या वाचून दाखवल्या, काय गंमत आहे बघा, मागच्या महिन्यात त्यांनी मला काही व्हिडिओ दाखवले होते त्यात अभिषेक देशमुख ला हॉस्पिटलमध्ये पेशंटचे नातेवाईक मारतात ते बघून लहान मुलं “अभी ला का मारतात”नका मारू त्याला, दुसरी पोस्ट होती “अभी ला हात लावला हातात तुला सोडत नाही” खूप प्रेमाचे मायचे comments त्यांनी मला दाखवले होते.
आज अभिषेक देशमुख साठी नाही निरंजन कुलकर्णी याच्यासाठी मला काहीतरी लिहावसं वाटलं ,
तीन वर्षांपूर्वी कलावंत स्टुडिओमध्ये “तू अशी जवळी रहा” या सिरीयल मध्ये माझ्या मुलाचा रोल करण्यासाठी एक गोरागोमटा, गोंडस, त्याचे डोळे खूप बोलके, असा मुलगा माझ्या मेकअप रूम मध्ये आला क्षणात आमची गट्टी झाली, खोडकर मस्तीखोर, मिश्किल, हसमुख.जवळजवळ दोन वर्ष आम्ही एकच मेकपरूम शेअर केले एकत्र जेवायचं ,गप्पा मारायच्या, हसत खेळत मजेत शूटिंग करायच॔,
मी एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो होतो, हा मुलगा रात्रभर तिथे थांबला, दुसऱ्या दिवशी सकाळी शूटिंग होतं पण तरीही थांबला. दीड वर्षा पूर्वी आम्ही परत बाप लेक म्हणून “आई कुठे काय करते” मध्ये हे एकत्र आलो. त्याच्याशी एक वेगळं नातं नकळत जुळत गेलं ,अतिशय प्रेमळ त्याचे आई वडील जे अंबरनाथला असतात, मी आणि माझी बायको एकदा त्यांच्या घरी गेलो होतो तर आमचा खूपच पाहुणचार केला, निरंजन मध्ये त्याच्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहेत ,
आता हे लिहिण्या मागचं कारण असं, जेंव्हा एक कलाकार एखादा रोल करतो, त्या वेळी रोल प्रमाणे त्याला लोकांच्या प्रतिक्रिया मिळत असतात, ज्यावेळेला निरंजन ने ज्ञानेश्वर ,श्रीकृष्ण, विष्णू, यांच्या भूमिका केल्या त्याला कौतुकाचे वर्षाव झाले आणि आता डॉक्टर अभिषेक देशमुख अंकिताशी लग्न करून येतो आणि अनघाला सोडून देतो त्या वेळेला त्याला शिव्याशाप मिळतात,
निरंतन एक उत्तम कलाकार आहे तो जसं कौतुक एक्सेप्ट करतो तसेच तो तिरस्कार सुधा एक्सेप्ट करतो आहे.पण मला खूप दु:ख होत आहे.अनिरुद्ध देशमुख म्हणून मला शिव्या बसल्या त्याचं मला काही वाटत नाही, मी हसत हसत memes पण स्वतः शेअर करतो .पण मिलिंद गवळी म्हणून निरंजन कुलकर्णी ला hate messages पाठवतात त्या वेळेला राग येतो ,वाईट वाटत , त्रास होतो,
एका उत्तम कलाकाराच्या पालकाच्या, आई वडीलच्या वेदना खूप कमी लोक समजू शकतात ,त्याला कोणी वाईट बोललेल सहन होत नाही. तर तुम्हांला ही मालिका कशी वाटते आणि मालिकेत आलेल्या ट्विस्ट बद्दल काय काय बोलाल हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.