स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील आजी म्हणजे अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारलेल्या कांचनच्या भूमिकेला प्रेक्षकांची खुप पसंती मिळत आहे. कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असतात. या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारून अर्चना पाटकर घराघरात पोहोचल्या आहेत. खुप कमी लोकांना महित असेल की, त्यांची खऱ्या आयुष्यातील सुनदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.
अर्चना पाटकर यांचे सासर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हमरमळा येथे आहे. त्यांचे लग्न महेंद्र पाटकर यांच्यासोबत झाले . अर्चना पाटकर यांची सुनदेखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अर्चना पाटकर यांचा मुलगा आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक असुन ,तो हिंदी मालिकेसाठी काम करतो. आदित्यचे लग्न हेमलता बाणे सोबत झाले असुन ती एक अभिनेत्री आहे. तिने इयत्ता सातवीत असतानाच ‘मस्ताना’ हा स्टेज शो केला. आम्ही सातपुते,चिरगुट , साहेब , इवलासा खोपा, मोहर , कॅरी ऑन देशपांडे , सत्य सावित्री आणि सत्यवान यांसारख्या अनेक चित्रपटांमधून अभिनेत्री हेमलता बाणे दिसून आली. आणि आता तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
तर तुम्हांला अभिनेत्री अर्चना पाटकर यांची रिअल लाइफ सुन कशी वाटली हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा .