Aai Kuthe kay karte : आशुतोष च्या जाण्यामुळे माझी मनस्थिति खूप जास्त.. म्हणून मी..

Aai Kuthe kay Karte : स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मलिकेत एक अरुंधतीच्या जीवनाने एक वेगळ वळण घेतल आहे. आशुतोष सोबत सुखाने संसार करण्यात रमनाऱ्या अरुंधतीच्या जीवनावर पुन्हा एकदा दुःखाचे डोंगर कोसळलेत. मलिकेत आशुतोष च्या एक्सीडेंट मुळे झालेल्या मृत्यू मुळे अरुंधतीने तिच्या आयुष्याचा साथीदार पुन्हा एकदा गमावला आहे. आशुतोष च्या अचानक मृत्यूमुळे सुलेखा ताई म्हणजे आशुतोष ची आई अरुंधतीला जेव्हा घरातून जायला सांगते तेव्हा देशमुख कुटुंब अरुंधतीचा भक्कम आधार बनून उभ राहत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Aai Kuthe kay Karte या मालिकेत सतत येणाऱ्या वळणामुळे अरुंधतीच आयुष्य मात्र सतत दुःखाच्या चक्रात अडकत आहे . त्यामुळे या मालिकेला आणि यातील कलाकारांना टिकेला सामोर जाव लागत आहे.

Aai Kuthe Kay Karte Arundhati

प्रेक्षकांना अरुंधती आणि आशुतोष चे सुखाचे क्षण पाहायला आवडत होते की अचानक मालिकेमधून आशुतोष च्या जाण्यामुळे पुन्हा एकदा अरुंधतीच्या आयुष्यात दुःख बघाव लागणार आहे.

याबद्दल सोशल मिडिया वर टिकेची भूमिका घेऊन प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला टिकेला सामोरे जाव लागणार आहे हे मालिकेतील कलाकारांना आपसूकच माहीत असल्यामुळे, अरुंधतीची भूमिका साकारत असलेल्या मधुराणी प्रभूलकर या मात्र काही दिवस सोशल मिडिया पासून दूर होत्या.

मलिकेत सतत दुःखाचे क्षण शूट!

Aai Kuthe kay Karte मलिकेत सतत दुःखाचे क्षण शूट करत असल्या मुळे त्यांना मानसिक ताण सहन करावा लागला होता. पण आज वेळात वेळ काढून मधुराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर आशुतोष म्हणजेच ओमकार गोवर्धन याबद्दल एक खास पण भावनिक अशी पोस्ट शेयर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मधुराणी यांनी केप्शन्स मध्ये लिहील की,

मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय

आशुतोषचं ‘जाणं ‘ अनेकांना आवडलं नाहीये…कसं आवडेल…. !

आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला… पण स्वीकाराव्या लागतातच. 

तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल.

गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे… 

१२/ १३ तास सलग असे काही दिवस रडते आहे… ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो..

हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच… डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही ( unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात .

अरुंधती आशुतोष ला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. @omkargovardhan

ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय.

पुढे परत काम करूच….!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील..!

हे पण वाचा!

अभिनेता सुयश टिळकची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत होणार दमदार एण्ट्री!

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका होणार बंद? ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Leave a Comment