Aai Kuthe Kay Karte : सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनघाईचं वातावरण निर्माण झालं आहे. अभिषेक देशमुख आणि सोनाली पाटील, रेश्मा शिंदे, हेमल इंगळे, तसेच शाल्व किंजवडेकर आणि श्रेया बुगडे यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी अलीकडच्या काळात आपलं लग्न उरकलं आहे. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं नाव समाविष्ट होणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस या अभिनेत्रीचा साखरपुडा झाला होता आणि लवकरच ती विवाहबंधनात अडकून आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहे.
‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मराठी मालिका या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर मालिकेचा प्रवास संपत आहे. मालिकेचं शूटिंग १९ नोव्हेंबर रोजी पूर्ण झालं असून आता सगळे कलाकार आपापल्या घरी परतले आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून गेली, आणि यामधील यशची पत्नी आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकरदेखील प्रेक्षकांच्या विशेष प्रिय ठरली.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचा निरोप आणि अभिनेत्रीचं लग्नाचं वळण
आता कौमुदी वलोकर खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. सध्या तिच्या घरी लग्नपूर्व विधींना सुरुवात झाली आहे. केळवण समारंभाच्या निमित्ताने तिच्या कुटुंबीयांनी तिला मोठ्या उत्साहात सन्मान दिला. शूटिंग संपवून घरी आलेल्या कौमुदीचं तिच्या कुटुंबीयांनी औक्षण केलं. या खास प्रसंगासाठी कौमुदीने पारंपरिक लूक धारण केला होता. तिच्या कुटुंबीयांनी तिला साग्रसंगीत जेवण दिलं, ज्यामध्ये कौटुंबिक प्रेमाची झलक दिसून आली. “सुगरण मामी आणि मामा, हौशी दादा-वहिनी” असं कॅप्शन देत कौमुदीने केळवणाचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले. या सगळ्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
Kashmira Shah : कॉमेडियन कृष्णा च्या बायकोचा भीषण अपघात..संपूर्ण बॉलीवूड हादरलं..
कौमुदीचा होणारा जोडीदार
कौमुदी वलोकरचा होणारा नवरा आकाश चौकसे आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. आता तिच्या लग्नाची अधिकृत तारीख जाहीर होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
कौमुदीचा अभिनय प्रवास
कौमुदीच्या अभिनय कारकिर्दीचा विचार केला, तर तिने ‘शाळा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये अभिनय केला, पण ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आरोहीच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. तिच्या अभिनय कौशल्याने आणि साध्या-सोप्या स्वभावामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं.
कौमुदीच्या या नव्या प्रवासासाठी तिच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लवकरच ती विवाहबंधनात अडकून आपलं वैवाहिक आयुष्य सुरू करणार आहे.