आणि तो अद्भुत प्रवास संपला………. संग्रामने भावुक पोस्ट शेअर करत मानले आभार!

योग योगेश्वर जय शंकर ही कलर्स मराठीवरील पौराणिक मालिका. या मालिकेला प्रेक्षक चांगलीच पसंती देत होते. मालिकेचा trp देखील चांगला होता. परंतु ही मालिका बंद झाली आहे. १४ ऑक्टोबरला योग योगेश्वर जय शंकर या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. त्याचबरोबर कस्तुरी ही मालिका देखील बंद करण्यात आली आहे. या मालिकेत शंकर महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला होता. शंकर महाराजांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार आरुष बेडेकरने तर मोठ्या शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळने साकारली होती .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही महिन्यांपूर्वी शंकर महाराज यांच्या जीवन चरित्र्याच्या महा अध्यायाचा आरंभ झाला होता. मालिकेतील शंकर महाराज मोठे झाले होते. तसेच अभिनेता संग्राम समेळ शंकर महाराजांची भूमिका छान अशी पार पाडत होता. प्रेक्षक ही पौराणिक मालिका देखील पहायचे. मग अशात मालिका का बंद करण्यात आली म्हणून, प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संग्रामने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करून प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत.

आणि तो अद्भुत प्रवास संपला. या प्रवासात महाराजांनी खूप शिकवलं. एक कलाकार आणि एक माणूस म्हणून. Personally माझ्यासाठी खूप challenging होतं ही भूमिका करणं. Physically आणि mentally सुद्धा. पावलोपावली महाराज परीक्षा घेत होते पण तरीही मला सांभाळायला माझी आपली माणसं खंबीर होती. मी कधीही घरापासून इतका काळ लांब राहिलो न्हवतो आणि यावेळी सुद्धा बाहेरगावी daily soap घ्यायची मनाची तयारी नव्हती. पण ही भूमिका करायला मला माझ्या बायकोने तयार केलं आणि नुसतं तयार केलं नाही तर 9 महिने खंबीर पणे घर सांभाळलं, माझ्या 86 वर्षाच्या आजीला सांभाळलं. कितीतरी वेळा स्वतःच्या करिअर कडे दुर्लक्ष करून घर सांभाळलं, जेणे करून मला माझं काम नीट करता यावं आणि माझे आई बाबा जे सतत आम्हा दोघांच्या पाठीशी होते, आम्हाला दोघांना कधीही खचू दिलं नाही. मी लांब असण्याची त्यांची तळमळ कधी माझ्यापर्यंत पोचू दिली नाही, जेणे करून मला माझे 100 टक्के देता यावेत. माझे आई बाबा म्हणजे माझे पहिले समीक्षक ज्यांनी वेळोवेळी माझं कौतुकही केलं आणि कमी पडलो तिकडे कान पण धरले कारण मला त्यांनीच सगळं शिकवलंय.

“महाराज आता मोठे होणार आहेत. तू निर्मात्यांना फोन कर” असं सांगणारा माझा मित्र आणि या मालिकेच्या 200 हून अधिक भागांचा संवाद लेखक समीर काळभोर याचे खूप आभार. माझं नाव सुचवणारा माझा मित्र विजय साबळे याचे आभार. मालिकेचे निर्माते संजय झणकर सर यांनी माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवला आणि मला त्यांच्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी दिली. सर तुमच्या सारखी गोड माणसं दुर्मिळच. आमची टीम ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आमचे creatives प्रवीण चंदनशिवे, अंजली चासकर, युवराज घोरपडे सर, अनुजा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांनी वेळोवेळी माझं मार्गदर्शन केलं. आमचे लेखक शिरीष लाटकर, पराग कुलकर्णी, समीर काळभोर, आशुतोष पराडकर, शरीर माझं पण आत्मा तुम्ही होतात. आमचे उत्तम दिग्दर्शक विठ्ठल डाकवे सर, सचिन गोताड सर, बाबा केंद्रे सर तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. DOP सचिन मेहता ज्यांनी प्रत्येक Frame जिवंत केली. आमची production टीम अमित पारकर, सुकुमार डे, अमित, चेतन बिर्ला, किरण, अतिष, सुनील, मेहुल, अविनाश. Make up team राज वाघमारे, सोनू ज्यांच्यामुळे माझा चेहरा महाराजांसारखा दिसायचा.

Costume वैदेही वैद्य जिनी माझा लुक उत्तम केला. आमचे दुसरे निर्माते चिन्मय उदगीरकर, ऋषिकेश उदगीरकर यांचे आभार. एक शो takeover करून तो यशस्वीपणे चालवणं सोपं न्हवतं. चिन्मय तुझ्या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहतोय.

ललित २०५, पुढचं पाऊल, हे मन बावरे, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकांमध्ये संग्रामने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर मित्रांनो योग योगेश्वर जय शंकर ही मालिका अचानक बंद करण्यात आली, यावर तुमचे मत काय? तुम्ही योग योगेश्वर जय शंकर या मालिकेला मिस करता का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment