अभिनेत्री शिवानी सोनार साकारणार सिंधुताई माझी माई या मालिकेत मोठ्या सिंधुताईंची भूमिका!

राजा राणीची गं जोडी ही कलर्स मराठीवरील मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षक नाराज देखील होते. या मालिकेत संजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहचली. राजा राणीची गं जोडी या मालिकेमुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर शिवानी कोणत्याही मालिकेत दिसली नाही. आता शिवानीचे नाव खुप चर्चेत आहे, कारण ती कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेत मोठ्या सिंधुताईंची भूमिका साकारणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटिस आला आहे. १५ ऑक्टोबर पासून मोठ्या सिंधुताईचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. संसाराच्या जात्यावर दळता दळता वर्षं सरली, छोटीशी चिंधी आता मोठी झाली. असे कॅप्शन प्रोमोला देण्यात आले आहे. प्रोमो पाहता शिवानी सिंधुताईची भूमिका साकारणार असून, अतुल आगलावे सिंधुताईंच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत आपण सिंधुताईच्या लहानपणीच्या भूमिकेत अनन्या टेकवडे , त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत किरण माने, आजीच्या भूमिकेत प्रिया बेर्डे यांना पाहिले होते.

शिवानीला चाहत्यांनी आणि कलाकारांनी खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका सिंधुताई माझी माई आपल्या कलर्स मराठीवर. तुम्ही मोठ्या सिंधुताईच्या भूमिकेत शिवानी सोनारला पाहायला उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment