सोनी मराठी वाहिनी नेहमी निरनिराळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता सोनी मराठी वाहिनी दोन नव्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ आणि ‘खरंच तिचं काय चुकलं?’.
हे विषय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या मालिकेत दोन सख्ख्या बहिणींची गोष्ट पाहायला मिळणार आहेत. भिन्नविभिन्न स्वभावांच्या या बहिणी कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सोबतच गायत्री सोहम ही अभिनेत्री नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दमयंती या व्यक्तिरेखेत ती दिसणार आहे. दमयंती ही श्रेयसची आई आहे आणि गायत्री सोहम ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. दमयंतीच्या लूकची चर्चा फार रंगली आहे. दमयंती ही एक यशस्वी उद्योजिका आहे आणि करारी वृत्ती असलेली अशी तिची व्यक्तिरेखा आहे. नकारात्मक भूमिका असल्यामुळे दमयंतीचा स्वभाव स्वार्थी असणार आहे. काटकारस्थानी आणि अहंकारी असलेली ही व्यक्तिरेखा गायत्री सोहम कशा प्रकारे साकारणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. गायत्री पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार आहे.
आभा आणि कुहू यांच्या आयुष्यात दमयंती येण्याने काय बदल होतील आणि श्रेयस कोणाची बाजू घेणार, हे या मालिकेत पाहायला मिळेल. आभा आणि कुहू या भिन्न स्वभावांच्या बहिणी आहेत. दमयंतीने आखलेल्या कटकारस्थानामध्ये त्या अडकतात का, जर अडकल्या तर त्यातून स्वतःची सुटका कशा प्रकारे करतील. दमयंती ही महत्त्वाकांक्षी स्वभावाची आहे. तिच्या आयुष्यातील तिची जी काही ध्येये आहेत ती पूर्ण करण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. आता तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना किती पसंतीस पडते, हे पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका, नवी मालिका, ‘खरंच तिचं काय चुकलं?’ ३ ऑक्टोबरपासून सोम. ते शुक्र. रात्री ९:३० वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर.