अभिनेत्री राधा सागरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस मुलाला जन्म!

अभिनेत्री राधा सागरने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आपण लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. राधाचे डोहाळे जेवण देखील थाटामाटात पार पडले होते. डोहाळे जेवणाचे फोटो खूपच व्हायरल झाले होते. राधा आई होणार असल्याचं कळताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी खुप साऱ्या कमेन्टचा वर्षाव केला होता. राधाने गरोदरपणामुळे कामाला देखील सुट्टी घेतलीय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राधा आणखी एकदा खुप चर्चेत आहे कारण आज राधाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. राधाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. याची माहिती राधा आणि तिचा नवरा सागर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती. राधा आणि सागरला खुप साऱ्या कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राधा तिचा नवरा सागर आणि लहान बाळाचा हातात हात घेऊन सुंदर असा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. फोटोला राधाने सुंदर असे कॅप्शन देखील दिले आहे. आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण. आमच्या बाळाचा जन्म. तो खरोखरच चमत्कारिक आहे. जीवनाच्या या नव्या मालिकेत आई आणि बाबा म्हणून निवड केल्याबद्दल खुप आभार. आम्ही खरोखरचं धन्य झालो. असे आकर्षक कॅप्शन राधाने दिले आहे.

atoz मराठीकडून राधा आणि सागरला खुप साऱ्या शुभेच्छा!

Leave a Comment