या मराठमोळ्या अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली!

काही सेलेब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाहीत, तर काही जन आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलतात. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटीच्या पर्सनल लाईफ विषयी जाणून घ्यायला आवडते. कलाकार सोशल मीडिया द्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधत असतात. सोशल मीडिया द्वारे आपल्या प्रेमाची कबुली देत आपल्या होणाऱ्या जीवनसाथी सोबत नेहमीच फोटो पोस्ट करत असतात. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने समुद्र किनाऱ्यावरील फोटो पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव आहे मीरा जोशी. मीराने तिच्या प्रियकरसोबतचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने या फोटोला सुंदर असे कॅप्शन देखील आहे. Drunk in Love असे कॅप्शन लिहीत पुढे हार्ट ईमोजी देखील तिने दिला आहे. मीराला तिच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मीरा जोशीचा बॉयफ्रेंड हा पाठमोरा उभा असून, तो नेमका आहे तरी कोण? हे जाणून घ्यायची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. मीराने त्यांचं नाव गुपीतच ठेवले असून, लवकरच त्याच्या नावाचा खुलासा करेन असे देखील सांगितले आहे.

चालू द्या तुमचं, शिवा, वृत्ती, लाल बत्ती, माझ्या बायकोचा प्रियकर अशा अनेक चित्रपटामध्ये मीराने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तुझं माझं ब्रेकअप, प्रेमा तुझा रंग कसा मालिकांमध्ये मीराने उत्तम अभिनय केले आहे.

तुम्हाला काय वाटतं कोण असेल मीराचा प्रियकर? मीराच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment