फायटर हा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असल्याचं समजतंय आणि ‘पठाण’च्या जबरदस्त यशानंतर सिद्धार्थ आनंद पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. भारतीय सिनेसृष्टीतील वॉर डायरेक्टर अशी ख्याती असलेल्या या दिग्दर्शका कडून पुढील प्रोजेक्ट् काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि ते सध्या “फायटर “वर काम करत असल्याचं समजतंय.
हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या सोशल मीडिया वर उद्या काहीतरी मोठे येत असल्याचे संकेत देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आणि या चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांकडून सिद्धार्थ आनंदने बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यासाठी स्टेज सेट करत असल्याच समजतं आहे.
सूत्र अस सांगतात चित्रपटाचे निर्माते स्वातंत्र्य दिनाच्या खास दिवशी मोशन पोस्टरवर काम करत आहेत आणि त्याला ‘स्पिरिट ऑफ फायटर’ म्हटले जाते आणि ते प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि उत्साहवर्धक असणार आहे.”
स्टार-स्टडेड कास्टसह फायटर अॅक्शन शैलीला पुन्हा परिभाषित करण्यासाठी हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत आणि 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.