मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कौतुक केलं बाईपण भारी देवा या चित्रपटाचं! विडियो कॉलद्वारे या अभिनेत्रीचं केल कौतुक………

बाईपण भारी देवा हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई देखील केली आहे. या चित्रपटाचे शोज हाऊसफूल आहेत. बाईपण भारी देवा चित्रपटाचे सर्वांनीच भरपूर कौतुक केले आहे. भारताचा फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग काल करण्यात आले होते. सचिन तेंडुलकर त्यांची पत्नी स्क्रीनिंगला उपस्थित होते. चित्रपटातील सर्व कलाकार, केदार शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील स्क्रीनिंगला उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या चित्रपटातील एक अभिनेत्री मात्र स्क्रीनिंगला उपस्थित नव्हती, ती म्हणजे दीपा परब चौधरी . दीपा परब चौधरी सचिन तेंडुलकर यांची खुप मोठी फॅन आहे. सचिन तेंडुलकर यांनी दीपा परब चौधरीशी विडियो कॉल वर संवाद साधला असून, तिच्या कामाचं खूपच कौतुक केलं. विडियो कॉल वरचा संवाद दीपाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिला आहे.

दीपाने सुंदर असे कॅप्शन पोस्टला दिले आहे. दीपाने म्हटले आहे – THE DREAM COME TRUE MOMENT

सचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील…. त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला. पण…YES…It’s Fact… शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण. मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो… आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो… आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं… अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU @saneness_ आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोन साठी.

Leave a Comment