अभिनेत्री मीरा जगन्नाथने सोडली ठरलं तर मग मालिका, ही अभिनेत्री दिसणार साक्षीच्या भूमिकेत!

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह. ही वाहिनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. TRP च्या बाबतीत ही वाहिनी लोकप्रिय आहे. सध्या स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका trp च्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेचे कथानक तसेच सर्व पात्रे खूपच चांगली आहेत. अर्जुन सुभेदार आणि सायली यांची जोडी देखील प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या मलिकेत अमित भानुशाली याने अर्जुन, जुई गडकरीने सायली, मीरा जगन्नाथने साक्षी तर प्रियंका तेंडोलकरने प्रिया नावाची भूमिका साकारली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मीरा जगन्नाथची साक्षी नावाची भूमिका नकारात्मक असली तरी प्रेक्षकांना फार आवडायची. मीराचे चाहते देखील तिला एक नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक होते. ठरलं तर मग या मालिकेत मीरा जगन्नाथ छोट्या पडद्यावर महत्वाची भूमिका साकारणार कळल्यावर चाहते खूपच खुश होते. पण खुप कमी वेळेत मीराने ही मालिका सोडल्याची सर्वत्र चर्चा आहे. मीराने खरंच ही मालिका सोडली असेल का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिका सोडण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. मीराने ठरलं तर मग ही मालिका सोडली असून तिच्या जागी साक्षीची भूमिका अभिनेत्री अभिनेत्री केतकी पालव साकारणार आहे. आतापर्यंत आपण साक्षीच्या भूमिकेत मीराला पाहत होतो, आता यापुढून केतकीला पाहणार आहोत.

केतकीने श्रावनबाळ रॉकस्टार, श्रीमंताघरची सून, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या असून, तिचे उत्कृष्ट अभिनय आपल्याला पाहायला मिळाले आहे. ठरलं तर मग या मालिकेत ती साक्षीची भूमिका देखील उत्तमरीत्या साकारेल.

मीराला साक्षीच्या भूमिकेत तुम्ही मिस कराल का? केतकीला साक्षीच्या नकारात्मक भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment