बहुचर्चित ” घुमर ” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

अखेर प्रतीक्षा संपली असून “
घूमर” या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. जो प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथा दाखवणार असल्याचं समजतंय. “
घुमर ” च्या टीझर आणि पोस्टर आल्यापासून हा चित्रपट काय असणार याचा सोशल मीडिया वर चर्चा होताना दिसल्या आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता अभिषेक बच्चन दूरदर्शी दिग्दर्शक आर. बाल्की आणि अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री सैयामी खेर यांच्या दमदार भूमिका “घूमर” मधून अनुभवयाला मिळणार आहेत. भारतातील स्पोर्ट्स चित्रपटाच्या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या ट्रेलब्लॅझिंग सिनेमॅटिक चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत असून त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण येते आणि जेव्हा तो पॅराप्लेजिक खेळाडू ला ट्रेन करताना दिसतोय जी भूमिका अभिनेत्री सैयामी खेर साकारणार आहे. पुन्हा एकदा र्दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनाची जादू या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.

अभिषेक आणि सैयामीचे दमदार परफॉर्मन्स त्यांच्या मनातील वेदना, खेळासाठी दृढनिश्चय आणि आशा अनेक लक्षवेधी क्षणाची पर्वणी यातून अनुभवयाला मिळणार असून दिग्दर्शक आर. बाल्की यांची अनोख्या शैली तून “. घुमर ” ची कथा गुंफली गेली आहे.

“घूमर” च्या ट्रेलरने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार असल्याचं कळतंय. ” घूमर” हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला आगामी भारतीय चित्रपट असून त्यांनी “चीनी कम,” “पा,” आणि “पॅड मॅन” सारख्या प्रशंसित चित्रपटाच दिग्दर्शन देखील केलं आहे.

‘घूमर’ मध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर प्रमुख भूमिकेत आहेत दिसणार असून शबाना आझमी आणि अंगद बेदी देखील यात अनोख्या भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात एक ट्विस्ट म्हणून दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची खास एंट्री असणार आहे. शिवेंद्र सिंग आणि इनवाका दास यांच्याही या चित्रपटातून पदार्पण होत आहे.

आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित आहे “घूमर” 18 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Leave a Comment