शिव ठाकरे या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्रीला करतोय डेट ?

आपला मराठी माणूस शिव ठाकरे याने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रोडीज, त्यांनंतर मराठी बिग बॉस , हिंदी बिग बॉस आणि आता खतरोके खिलाडी अशा शोज मधून त्याने भरपूर मेहनत करत खुप प्रसिद्धी मिळवली आहे. शिवचा खुप मोठा चाहता वर्ग बनला आहे. अमरावतीचा शिव आता घराघरांत पोहचलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


शिवचा खतरो के खिलाडी हा शो कलर्स वर प्रेक्षक पाहत आहेत. या शो मध्ये त्याची बऱ्याच कलाकारांसोबत आपण मैत्री देखील पाहिली आहे. अंजुम फाकीह, रूही चतुरवेदी, डेजी शाह, अरिजित तनेजा, रोहित बोस रॉय यांच्या सोबत आपण खास बॉंडिंग पाहिली आहे.


बिग बॉस मराठी पर्व 2 मध्ये त्याची खास मैत्री आपण अभिनेत्री वीणा जगताप सोबत पाहिली आहे. या शो नंतर दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसले. दोघे डेटही करत होते. पण काही कारणास्तव दोघांची मैत्री तुटली. आता शिवचे नाव जय हो या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री डेजी शाह सोबत जोडले गेले आहे. दोघांची मैत्री खतरो के खिलाडी या शो मध्ये आपण पाहिली आहे. दोघांना बऱ्याच ठिकाणी स्पॉट देखील केले आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र आहेत. आम्ही खुप चांगले मित्र आहोत, असे शिवने सांगितले आहे.


डेजी आणि शिवने रितेश दादा आणि सलमान खानच्या वेड लावलंय गाण्यावर नुकताच खुप छान डांसही केला आहे. तुम्हाला डेजी शाह आणि शिवची जोडी पाहायला आवडेल का ? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment