पारंपारिक पद्धतीने भर पावसात अरुण कदम यांच्या मुलीचे मॅटर्निटी फोटोशूट …..

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून सर्वांना हसवणारे अरुण कदम लवकरच आजोबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी सुकन्या हीचे डोहाळे जेवण पार पडले होते. आता सुकन्याचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडिया वर खूपच व्हायरल होत आहेत. सुकन्याने अगदी पारंपारिक पद्धतीने साजशृंगार केला असून, नऊवारी साडी, गळ्यात डोरलं, नाकात नथ, पायात कोल्हापुरी चप्पल असा तिचा लुक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुकन्याचा नवरा सागर पोवाळे याने धोती, सदरा, काळा कोट आणि काळी टोपी असा लुक केला आहे. सुकन्या आणि सागर दोघेही या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. भर पावसात त्यांचे फोटोशूट पार पडले आहे.

आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची भावना असते, असे सुंदर कॅप्शन सुकन्याने या फोटोला दिले आहे. सुकन्या आणि सागर यांचे मॅटर्निटी फोटोशूट तुम्हाला आवडले का ? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment