प्रत्येकाचं लहानपणापासून मोठं स्वप्न असतं. काही न काही बनण्याची सर्वांची ईच्छा असते. मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुले कला क्षेत्रात वळतात. तर काहीजण आपापल्याला आवडीनुसार वेगळे क्षेत्र निवडून त्यातचं करियर करतात.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या अभिनयातून एक चांगलाच चाहता वर्ग निर्माण केला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षे पायलट झाली आहे. याची माहिती स्वतः शरद पोंक्षे यांनी सोशल मीडिया द्वारे दिली आहे. चौथीपासून पाहिलेले स्वप्न त्यांची मुलगी सिद्धीने पूर्ण केले आहे. परदेशात राहून शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलीसाठी शरद पोंक्षे यांनी खास पोस्ट शेअर करत सुंदर असे कॅप्शन लिहिले आहे.
कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत. कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.
कलाकारांनी आणि चाहत्यांनी सिद्धीला खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.