बिग बॉस मराठी 4 सीजन हा खूपच गाजला. या सीजन मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी. बिग बॉसच्या घरात आपल्याला त्या दोघांची मैत्री पाहायला मिळाली होती. बिग बॉस नंतर दोघेही एकमेकांसोबत चांगलाच टाइम स्पेंड करत होते. सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करायचे. जेव्हा प्रसाद आणि अमृता यांना त्यांच्या नात्याबद्दल विचारलं जायचं तेव्हा दोघेही आम्ही खुप चांगले फ्रेंड्स आहोत असे उत्तर द्यायचे. पण या गोष्टीला पूर्णविराम लागला आहे.
दोघांनी त्यांचा साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियाद्वारे दोघांनी त्यांच्या एंगेजमेंट गोड बातमी दिली आहे. दोघांनी एकमेकांच्या रिंग दाखवत फोटो पोस्ट केले आहेत. we are engaged असे लिहून, लग्नाची तारीख 18 नोवेमबर 2023 रोजी आहे. दोघांना खुप साऱ्या कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
we are engaged! we are officially nominating each other as permanent team members and we are ready to face any tasks that come our way. असे सुंदर कॅप्शन त्यांनी लिहिले आहे. साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. चाहत्यांनी त्यांना #pramruta असे नाव देखील दिले आहे.
त्यांच्या साखरपुड्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तुम्हाला अमृता आणि प्रसादची जोडी आवडते का? त्यांच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.