हृदयी प्रीत जागते या मालिकेनंतर सिद्धार्थ खिरीड झळकणार ‘राणी मी होणार’ या सोनी टीव्ही वरील मालिकेत!

अभिनेता सिद्धार्थ खिरीड एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो अनेक मालिकांमधून वेगवेगळे पात्र साकारत असतो. त्याची हृदयी प्रीत जागते या मालिकेने काही दिवसांपूर्वी निरोप घेतला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता त्याची ‘राणी मी होणार’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राणी मी होणार मालिका 21 ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री 8 वा. सोनी मराठीवर प्रदर्शित होणार आहे. आपण त्याला अनेक नायिकांसोबत काम करतांना पाहिले आहे. जाडूबाई जोरात या मालिकेत संचिता कुलकर्णी सोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. आताही सिद्धार्थ संचिता कुलकर्णी सोबत या मालिकेत दिसणार आहे.

राणी मी होणार या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थ या मालिकेत मल्हार नावाची मुख्य भूमिका साकारणार असून, संचिता मीरा नावाची मुख्य भूमिका साकारणार आहे. मीराला एक श्रीमंत राजकुमार तिच्या आयुष्यात हवा आहे. मल्हार म्हणतो मी आहे न तुझा राजकुमार . मीराला तिच्या राजकुमाराची ओढ आहे. पण मल्हार म्हणजेच सिद्धार्थ खिरीड हा मालिकेत गरीब दाखवण्यात आला आहे. संचिता आणि सिद्धार्थची केमिस्ट्रि आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थने जाडुबाई जोरात, फ्रेशर्स , एक होती राजकन्या, मुलगी झाली हो, हृदयी प्रीत जागते या मालिकेत त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुंदर आमचे घर, जाडूबाई जोरात, श्रावणबाळ रॉकस्टार या मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सिद्धार्थ आणि संचिताची नवी मालिका राणी मी होणार पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment