पर्यावरणीय आव्हानांना सध्या सगळेच तोंड देत आहेत आणि म्हणून अश्या परिस्थितीत पर्यावरणाच भान ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा आणि म्हणूनच अभिनेता करण कुंद्रा, यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एक अनोखं पाऊल उचललं आहे. त्याने एक उल्लेखनीय उपक्रम केला असून या अंतर्गत त्याने प्लास्टिक ऐवजी मेटल च्या बाटल्यांचे वितरण केले आहे पर्यावरणपूरक संदेश दिला आहे.
प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अभिनेता करण कुंद्रा यांनी भामला फाउंडेशन आणि वन अर्थ नेटवर्कसह पुन्हा वापरता येण्याजोग्या धातूच्या बाटल्या वापरण्याचे आवाहन केले आहे. शाळांमध्ये मेटल च्या बाटल्यांचे वाटप करून करण कुंद्रा ने तरुणाईला हा खास संदेश दिला आहे. पर्यावरण जपण्याचा उद्देश ठेवून हे महत्त्वपूर्ण पाऊल त्याने उचललं आहे.
पर्यावरणा बद्दल जागरूक राहून करण नेहमीच विविध उपक्रम करत असतो आणि त्यांच्या या कामाचं कौतुक देखील केलं जात. या अभिनेत्याचे आगामी प्रोजेक्ट्स काय असणार याची प्रेक्षकांना आता उत्सुकता देखील आहे.