अभिनेत्री राधा सागरच्या डोहाळे जेवणाचे सुंदर फोटोज!

आई कुठे काय करते, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर ही बऱ्याच दिवसांपासून खुप चर्चेत आहे. चर्चेचं कारण म्हणजे राधाची प्रेग्नसी. राधा ही लवकरच आई होणार आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही दिवसांपूर्वी तिने तिच्या वाढदिवसादिवशी पोस्ट करून ती आई होणार असल्याचे सांगीतले होते. राधा आणि तिचा नवरा सागर यांचा मॅटरनिटी फोटोशूटचा सुंदर असा विडियो खूपच व्हायरल झाला. होणाऱ्या आई बाबांना चाहत्यांनी तसेच कलाकारांनी खुप शुभेच्छा दिल्या.

राधाने डोहाळे जेवणाचे खुप छान फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ग कुणीतरी येणार येणार ग असे कॅप्शन लिहीत तिने फोटो पोस्ट केले आहेत. आपल्याला राधाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेसी ग्लो पाहायला मिळत आहे. तिच्या डोहाळे जेवणाचे काही अनसीन फोटो समोर आले आहेत. ते फोटो खूपच सुंदर आहे. राधा फोटोमध्ये जास्तच सुंदर दिसत आहे. त्याचे काही खास फोटो आपण पाहुयात.

राधा तिचा नवरा सागर आणि होणाऱ्या बाळाला खुप साऱ्या शुभेच्छा.

Leave a Comment