रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लवस्टोरीला सचिन खेडेकर आहेत कारणीभूत!

अभिनेत्री रेणुका शहाणे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. हिंदी चित्रपटांबरोबर तिने मराठी चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. रेणुकाने तिच्या करियरची सुरुवात हाच सूनबाईचा भाऊ या मराठी चित्रपटातून केली होती. त्यानंतर तिने सुरभी या हिंदी शो मध्ये निवेदन केले होते. यामुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर तिने हम आपके है कोन या चित्रपटामध्ये काम केले. अबोली, त्रिभंगा , 3 स्टोरीज बकेट लिस्ट, सैलाब, गोविंदा नाम मेरा, रिटा, ते आठ दिवस, जाणीव, इम्तिहान, मासूम, मनी अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका केल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोण होणार करोडपती 2023 च्या सेटवर रेणुका शहाणे यांनी त्यांच्या आणि आशुतोष राणांच्या प्रेमाचा किस्सा सांगितला आहे. जयते या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला ती गेली होती. या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर आणि किशोर कदम या रेणुका शहाणेच्या दोन मित्रांनी काम केले होते. त्यांच्या बोलवण्यामुळे ती तिथे गेली होती. आशुतोष राणाही तिथे आले होते.

आशुतोष राणानी रेणुकाचा अभिनय पाहिला होता. पण रेणुका मात्र आशुतोष यांना अजिबात ओळखत नव्हती, कधी अभिनयही पाहिला नव्हता. स्क्रीनिंग मध्ये त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर रेणुका आणि आशुतोष यांची प्रेम कहाणी फोनवर चालू झाली. एक कविता ऐकवत रेणुका यांना आशुतोषने प्रपोज देखील केले.

दोघे एकमेकांना समोरासमोर भेटले. चांगली मैत्री झाल्यानंतर दोघांनी लग्न केले. रेणुका आणि आशुतोष यांना दोन मुले आहेत.

Leave a Comment