ब्रेकिंग बॅरियर्स सान्या मल्होत्रा ला ” ब्रेकथ्रू परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार “

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही एक अष्टपैलुत्व असणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने यंदाचा ग्राझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये “ब्रेकथ्रू परफॉर्मर ऑफ द इयर अवॉर्ड ” जिंकला आणि ती पुन्हा एकदा चर्चेत आली. तिचा तेजस्वी अभिनय नेहमीच प्रेक्षकांना आवडला. 2016 मध्ये दंगल या ब्लॉकबस्टर चित्रपटातून तिने पदार्पण केलं आणि सान्या ने पुढे जाऊन अनेक उत्तम चित्रपट केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बधाई हो, फोटोग्राफ, लुडो, मीनाक्षी सुंदरेश्वर आणि पगलाईट यांसारख्या गाजेलेल्या चित्रपटातील तिच्या भूमिका नेहमीच उल्लेखनीय ठरल्या.सान्या मल्होत्राचा स्टारडममध्ये वाढ होणं काही थांबत नाही तिने स्वतःची एक वेगळी ओळख संपादन केली. काही कथलमधील तिने साकारलेल्या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. ज्यामुळे एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखली जाऊ लागली.

या वर्षी ती दिग्गज शाहरुख खानसोबत आगामी ‘जवान’ चित्रपटात स्क्रीन स्पेस शेअर करणार असून सॅम बहादूर या बहुप्रतिक्षित चित्रपटात देखील दिसणार आहे.

Leave a Comment