स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका चांगलीच गाजतेय. प्रेक्षक या मालिकेला खुप पसंत करतात. या मालिकेतील अप्पू आणि शशांक यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप आवडते. त्या दोघांची छोट्या छोट्या गोष्टींवरून झालेली नोक झोक प्रेक्षकांना पाहायला खुप आवडत आहे. नुकतेच दुसऱ्यांदा या मालिकेत अप्पू आणि शशांक यांचे लग्न झाले.
या मालिकेतील कानिटकर कुटुंब नेहमीच अप्पूच्या पाठीशी उभे असतात. जशी मालिकेमध्ये या कलाकारांची बॉंडिंग आपल्याला पाहायला मिळते, तशीच खऱ्या आयुष्यात देखील त्यांची बॉंडिंग चांगली आहे. सर्व कलाकार एकमेकांसोबत मैत्रीचा बॉन्ड शेअर करतात.
या मालिकेतील कलाकार नेहमीच नवनवीन ठिकाणी फिरायला गेलेले फोटो पोस्ट करत असतात. सर्व कलाकार आता मान्सून ट्रिप एंजॉय करत आहेत. या ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण या शहरात ते सध्या ट्रिप एंजॉय करत आहेत. पेण हे गणपतींच्या मूर्तीसाठी जगप्रसिद्ध आहे.
तुम्हाला ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कलाकारांची मान्सून ट्रिप आणि फोटोज कशे वाटले? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.