प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या वार्षिक UK-इंडिया अवॉर्ड्समध्ये यूके-इंडिया रिलेशनमध्ये जीवनभर योगदानासाठी प्रतिष्ठित इंडिया ग्लोबल फोरमच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
UK-India Awards चा सर्वात मोठा मानला जाणारा हा सन्मान शेखर कपूर यांना प्रदान करण्यात आला. निर्माते शेखर कपूर यांना त्यांच्या कामगिरी साठी हा खास सन्मान देण्यात आला आहे. कपूर यांचे दूरदर्शी कथाकथन आणि दोन्ही संस्कृतींची सखोल समज असलेल्या त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा जागतिक पातळीवर दबदबा आहे.
निर्माते शेखर कपूर यांच्या सारख्या दिग्गज निर्मात्याच्या सोबतीने दोन देशातील कामाला या निमित्ताने सहकार्याला चालना मिळणार आहे. 29 जून रोजी झालेल्या या कार्यक्रमात युनायटेड किंगडम आणि भारत यांच्यातील विजयी भागीदारीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी विविध क्षेत्रातील 400 हून अधिक वरिष्ठ नेत्यांनी एकत्र आले होते. यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नामवंत लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
निर्माते शेखर कपूर यांनी सर्वात प्रतिभावान लेखक म्हणून जागतिक ख्याती मिळवली तर आहेच सोबतीने त्याच्या एलिझाबेथ आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज या चित्रपटांनी ऑस्कर जिंकले आहेत आणि त्याचा सर्वात अलीकडील चित्रपट ‘व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट’ नुकतेच 9 ब्रिटीश राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी नामांकन मिळाल. याच्या सुपरहिट दिग्दर्शनातील डेब्यू चित्रपट ‘मासूम’ च्या सिक्वेलमध्ये काम करत असल्याच्या बातम्यांमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.