अभिनेत्री, मॉडेल सनी लिओनने त्रिवेंद्रम फॅशन शोमध्ये डिझायनर श्रवण कुमार साठी शोस्टॉपर म्हणून हजेरी लावली तिच्या या खास उपस्थितीने प्रेक्षकांना थक्क केले. त्रिवेंद्रम फॅशन शो हा भव्य दिव्य फॅशन वीक असतो आणि अश्या या या बहुप्रतिक्षित फॅशन इव्हेंटने पुन्हा एकदा आपल्या भव्यतेने आणि ग्लॅमरने प्रेक्षकांची मन जिंकली. या वर्षी प्रसिद्ध फॅशन डिझायनर श्रवण कुमारने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनला त्याच्या खास शोकेससाठी शोस्टॉपर म्हणून निवड केली. सनी ने या खास शो मध्ये रॅम्पवर एक अनोखा अंदाज दाखवला.
सनी ने हाताने भरतकाम केलेल्या एका खास ड्रेस मध्ये दिसली.
सनीने कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या “केनेडी” चित्रपटासाठी पदार्पण केलं आणि जागतिक प्रेक्षकांकडून कौतुक मिळवलं.तिचे पात्र, चार्ली, प्रेक्षकांना खूप आवडले होते आणि या चित्रपटाला दक्षिण कोरियाच्या बुचेऑन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नामांकन देखील मिळाले आहे. तिचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये असून प्रेक्षक यांची आतुरतेने वाट बघत आहेत.