ब्लॉकबस्टर्सपासून ते बॉलीवूड मधल्या 40 Under 40 चा खास अवॉर्ड राजकुमार च्या नावावर !

बॉलीवूडचा पॉवरहाऊस परफॉर्मर म्हणून राजकुमार राव ओळखला जातो. नुकताच त्याने 40 अंडर 40 हा खास अवॉर्ड मिळवला आणि पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली. या प्रतिष्ठित पुरस्काराने राजकुमार एक नवखा आणि तितकाच सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. मनोरंजन, क्रीडा, फॅशन, आयटी, रिटेल, शिक्षण, आरोग्यसेवा आणि अश्या विविध क्षेत्रात 40 वर्षांखालील टॉप 40 तरुण उद्योजक , नेते यांच्या कामगिरीच कौतुक या खास पुरस्काराने करण्यात आलं.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेता राजकुमार रावचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास उल्लेखनीय आहे. 2010 मध्ये त्याच्या बॉलीवुड मधल्या पदार्पणापासून तो झपाट्याने काम करून बॉलिवूड स्टारडमच्या शिखरावर पोहोचला आहे. प्रत्येक कामाने त्याने तो अभिनेता म्हणून कसा उत्तम आहे हे दाखवून दिलं. आयकॉनिक काई पो चे पासून न्यूटन , रिव्हेटिंग ट्रॅप यांसारखे चित्रपट हे त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांची फक्त एक झलक आहेत.

या अभूतपूर्व अभिनेत्याने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडणारे अविस्मरणीय परफॉर्मन्स देऊन स्वतः च एक स्थान वेगळं स्थान निर्माण केले आहे. बरेली की बर्फी आणि स्त्री ते लूडो आणि द व्हाईट टायगरपर्यंत राजकुमार रावच्या अष्टपैलुत्वाला सीमा नाही आणि त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या, Bheed ने देखील त्याच्या अविश्वसनीय कलाकृती च कौतुक झालं.

यंदाच्या वर्षात राजकुमार राव जोरदार काम करत असून लवकरच तो विविध प्रोजेक्ट्स मधून दिसणार असून ” मिस्टर आणि मिसेस माही” , ” गन्स आणि गुलाब” आणि प्रेरणादायी श्रीकांत बोल्ला यांच्या बायोपिक मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सोशल मीडिया वर स्त्री 2 ची एक झलक फोटो मधून पाहायला मिळाली असून प्रेक्षक या साठी उत्सुक आहेत.

2023 हे वर्ष अभिनेता राजकुमार राव साठी सेलिब्रेटिंग वर्ष ठरतंय यात शंका नाही ! राजकुमार ला पुन्हा ऑन-स्क्रीन बघण्यासाठी आता सगळ्यांना उत्सुकता आहे.

Leave a Comment