प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन त्यांच्या गायनामुळे नेहमीच चर्चेत असतात. 15 जूनला सोशल मीडियावर पोस्ट करत मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांच्या नात्याविषयी प्रेक्षकांना सांगितले आहे. ‘आमचं ठरलंय’ असे कॅप्शन लिहीत त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. सध्या त्या दोघांचे चाहते खूपच खुश आहेत कारण ते लग्नाची वाट पाहत आहेत. आता लग्नाच्या बातमीला पूर्ण विराम लागणार आहे. कारण प्रथमेश ने इन्स्टाला पोस्ट करत त्याच्या पहिल्या केळवणा विषयी सांगितले आहे. सोशल मीडिया वर त्याच्या केळवणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या केळवणाचा विडियो खूपच व्हायरल होत आहे.
प्रथमेशने विडियो शेअर करत लिहिले आहे “आमचं ठरलंय” च्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवाणांना सुरुवात होतीय ! हे फीलिंग खूप भारी आहे! अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ “चतुरंग” ने केला त्याबद्दल चतुरंग च्या पूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद ! Missed you @mugdhabhagawan5
प्रथमेशने शेअर केलेल्या विडियोवरून दिसते की महिला पारंपारिक साडी घालून प्रथमेशची आरती करतात.त्याला शालही भेट करण्यात आली होती. पंच पक्वांनानी त्याचे ताट सजले होते. रत्नागिरीतील चतुरंग प्रतिष्ठानने त्याचे पहिलेवहिले केळवण केले होते. पारंपारिक पद्धतीने त्याच केळवण पार पडलं आहे. तो आपल्या होणारी बायको मुग्धाला मिस करत होता.
प्रथमेशने मुग्धाला मिस करत छान असा उखाणाही घेतला. ‘वाढलेलं पान रिकामं केलं एक एक घास घेत घेत , वाढलेलं पान रिकामं केलं एक एक घास घेत घेत…… चतुरंगच्या कार्यालयात माझ्या केळवणाचा फक्कड जमला बेत’.
प्रेक्षक मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची वाट पाहत आहेत.