सोनू सूदच्या SCF ” संभवम ” च अनोखं कार्य ! अभिनेता सोनू सूद वंचित तरुणाईची स्वप्नपूर्ती करणार !

अभिनय, समाजकार्य यातून नेहमीच सामान्य जनतेसाठी कायम हक्काने उभा असणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद ! सामान्य माणसाचा ‘मसिहा’ ही अनोखी पदवी सोनू सूद ला मिळाली आहे. या अभिनेत्याने महामारी च्या काळात असंख्य लोकांना मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. असुरक्षितांना मदत देणे असो , बेघरांना कपडे आणि निवारा देणे असो किंवा जीव वाचवणार्‍या एअरलिफ्टचे सोबत आपुलकीने केलेली विचारपूस असो सोनू सूदने अथकपणे समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या अथक वचनबद्धतेमुळे त्यांना केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही त्याचा बद्दलचा आदर वाढला असून जगभरातून सोनू च्या कामाचं कायम कौतुक झाल आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) चे संस्थापक म्हणून सोनू सूद ने कायम समाजासाठी असंख्य काम केली. समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि नवीन बदल घडवून आणण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केलं आहे. शिक्षण , आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि आपत्ती निवारणावर या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करून SCF च्या माध्यमातून सोनू ने लोकांचं जीवन बदललं आहे.

सूद चॅरिटी फाऊंडेशनने डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA) आणि सरत चंद्र अकादमी यांच्या सहकार्याने 2023-24 या वर्षासाठी ‘संभवम’ सुरू करण्याची घोषणा सोनू ने केली आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या सगळ्या तरुणाईला समर्पित असणार आहे ज्यांना नागरी सेवा परीक्षा चे विनामूल्य ऑनलाइन IAS कोचिंग, मार्गदर्शन मिळणार आहे.

सोनू च्या या अनोख्या कार्याने जगभरात अनेक तरुण IAS अधिकारी घडणार आहेत. SAMBHAVAM चे उद्दिष्ट हेच आहे की समाजातल्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींसाठी नव्या संधी निर्माण करणे आहे. DIYA आणि सरत चंद्र अकादमीसोबत भागीदारी करून, SCF एक चांगला आणि मजबूत भारत निर्माण नक्कीच करतील यात शंका नाही !

Leave a Comment