भारतातील रिअॅलिटी शोचा राज्य अभिनेता करण कुंद्रा ! रिअॅलिटी शो मेस्ट्रो अभिनेता करण कुंद्रा !

रिअॅलिटी शो हा मनोरंजनाचा मुख्य भाग मानला जातो. लक्षवेधी कथा आणि प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या रिअॅलिटी शो ने नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. रिअ‍ॅलिटी शो मध्ये अनेक टीव्ही कलाकारांची प्रामुख्याने नाव घेतली जातात आणि त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे करण कुंद्रा ! असामान्य कौशल्याने आणि मनमोहक व्यक्तिमत्त्वाने “द किंग ऑफ रिअॅलिटी शो” ही पदवी करण ने मिळवली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लॉक अप – करण कुंद्रा जेव्हा सनसनाटी रिअॅलिटी शो लॉक अपच्या पहिल्या सीझनसाठी जेलर म्हणून पाऊल ठेवल तेव्हा त्याने लोकांच लक्ष केंद्रीत केलं. जेलरच्या रूपात त्याचा यापूर्वी कधीही न पाहिलेला अवतार बघून प्रेक्षकांनी त्याच कौतुक केलं. करणने लॉक अप मध्ये त्याचा आणि तेजस्वी प्रकाश सोबतची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली.

बिग बॉस 15 – बिग बॉस 15 मधील करण कुंद्राचा कार्यकाळ त्याच्या कारकिर्दीत एक गेम चेंजर ठरला. खूप कमी वेळात त्याने उत्तम गेम खेळून मोहकतेने चाहत्यांच्या हृदयात एक स्थान निर्माण केल.

MTV रोडीज – करण कुंद्रा याने MTV रोडीजवर आपल्या अनोख्या उर्जेने एक अमिट छाप पाडली आणि प्रेक्षकां च प्रेम मिळवलं. विचार करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला एक अनोखा प्रेक्षकवर्ग मिळाला.

डान्स दिवाने – फक्त अभिनय नाही तर तो एक स्टार होस्ट देखील आहे हे सगळ्यांनी डान्स दिवाने मध्ये पाहिलं. करण कुंद्राचा डान्स दिवानेवर होस्टिंगचा कार्यकाळ प्रेक्षकांना मोहित करण्याचा होता.तो डान्स रिअॅलिटी शोचा एक अविभाज्य भाग बनला आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली.

एमटीव्ही लव्ह स्कूल – एमटीव्ही लव्ह स्कूलमध्ये न्यायाधीश म्हणून करण कुंद्राच्या भूमिकेने हे सिद्ध केले की भारतीय रिअ‍ॅलिटी शोच्या बाबतीत तो एक अष्टपैलू खेळाडू आहे.

करण कुंद्राचा रिअॅलिटी शोमधील प्रवास हा कायम प्रभावी ठरला. तो रिअॅलिटी टेलिव्हिजनच्या जगावर राज्य करत असणारा अभिनेता आहे यात शंका नाही.

Leave a Comment