द सोर्सेस सोबत चित्रपट निर्माता मोजेझ सिंग लिहिणार अनोख्या कथा !

मोझेझ सिंग एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि कथाकार म्हणून ओळखला जातो. त्याचा दूरदृष्टीने आणि उत्तम कथाकथनाने भारतीय चित्रपसृष्टीत त्याने अनेक चित्रपट केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मोझेझ “द सोर्ससह ” सोबत एक अनोखं कोलॅब करत आहे या बद्दल सांगताना तो म्हणतो ” मी द सोर्स सोबत दोन कथा लिहीत आहे त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभव नक्कीच छान आहे. वेगळ्या विषयावर आणि अपारंपरिक आणि धाडसी अशा कथा सांगण्यासाठी आम्ही काम करत आहोत”

फॉक्स स्टार स्टुडिओ आणि डिस्ने यूटीव्ही आणि राजकुमार हिरानी या सोर्सचे सल्लागार आहेत. 2 दशकांहून अधिक अनुभव असलेल्या मनोरंजन उद्योगातील दिग्गज शिखा कपूर या सोर्सचे च्या सर्वेसर्वा आहेत.

फॉर्म्युलेक चित्रपटांचे वर्चस्व असलेल्या लँडस्केपमध्ये मोजेझ सिंग एक अद्भुत कथाकार म्हणून त्याची ओळख आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणार्‍या यो यो हनी सिंगवरील आगामी डॉक्युमेंटरी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी तो तयारी करत असल्याचं समजतंय.

Leave a Comment