फुलाला सुगंध मातीचा नंतर हर्षद अतकरी झळकणार ‘कुन्या राजाची गं तू रानी’ …….. या स्टार प्रवाह वरील मालिकेत

स्टार प्रवाह ही वाहिनी लिकप्रिय वाहिनी आहे. TRPच्या बाबतीत म्हटलं तर हा चॅनल नंबर वन आहे. सर्व चॅनल मध्ये या मालिकेची TRP सर्वांत जास्त आहे. स्टार प्रवाह हा महाराष्ट्राचा नंबर वन चॅनल आहे. या वाहिनीवरील मालिका खूपच लोकप्रिय आहेत. या वाहिनीवरील कलाकारही खूपच लोकप्रिय आहेत. या वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही मालिका लवकरच निरोपही घेतात. स्टार प्रवाह वरील सर्वांची आवडती मालिका फुलाला सुगंध मातीचा या मालिकेने सुद्धा लवकरच निरोप घेतला. या मालिकेतील कीर्ती आणि शुभम या पात्रांना प्रेक्षकांनी खुप प्रेम दिले होते. कीर्ती आणि शुभमची जोडी सर्वांना आवडायची.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभम म्हणजेच अभिनेता हर्षद अतकरी पुन्हा एकदा स्टार प्रवाह वर एका नव्या कोऱ्या मालिकेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव कुन्या राजाची ग तू रानी असे आहे. कुन्या राजाची गं तू रानी मालिका स्टार प्रवाह वर १८ जुलैपासून संध्या ७:०० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत हर्षद मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हर्षद हा सर्वांचा आवडता अभिनेता आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही त्याची तिसरी मालिका आहे. त्याने दुर्वा, अंजली, सारे तुझ्याचसाठी, फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. त्याने त्याच्या करियरची सुरुवात दुर्वा या स्टार प्रवाहवरील मालिकेने केली होती.

कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये हर्षद अतकरी सोबत शरवरी जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हर्षदने या मालिकेत एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. कुन्या राजाची तू गं रानी या मालिकेत कबीर असे त्याच्या पात्राचे नाव आहे. आतापर्यंत त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पत्रकाराच्या भूमिकेत प्रेक्षक त्याला पहिल्यांदाच पाहणार आहेत.

शरवरी जोगने जीव झाला येडापिसा, जाऊ नको दूर बाबा या मालिकेत महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. ती आता हर्षद बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. शरवरी कुन्या राजाची तू गं रानी या मालिकेत ग्रामीण भागातिल मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका इमली या हिंदी मालिकेचा रिमेक आहे, असे म्हटले जाते.

Leave a Comment