अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे करोडो फॅन्स आजही त्याच्यासाठी न्याय मागतात. आजही लोक त्याची खुप आठवण करतात. मग त्याचा जन्मदिवस असो किंवा death anniversary . जन्मदिवसापेक्षा प्रेक्षक त्याच्या death चा दिवस आठवतात. कारण तो दिवस सर्वांसाठी खुप वाईट दिवस होता. तो दिवस सुशांतचा या जगातील शेवटचा दिवस होता.
आज सुशांत ला जाऊन 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. सोशल मीडिया वर फोटो, विडियो पोस्ट करून त्याचे फॅन्स त्याला खुप आठवतात. 14 जून 2020 ला बॉलीवुडच्या चमकत्या ताऱ्याने या जगाचा निरोप घेतला. सुशांत बांद्रा येथे मृत अवस्थेत सापडला होता. त्याच्या जाण्याने सर्वजन खुप शॉक्ड झाले होते.
छोट्या पडद्यापासून सुशांतने त्याच्या करियरची सुरुवात केली होती. किस देश मे होगा मेरा दिल या मालिकेपासून त्याने अॅक्टिंग ची सुरुवात केली होती. या मालिकेत त्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते. यानंतर पवित्र रिश्ता या एकता कपूरच्या मालिकेत त्याला लीड रोल मिळाला. मानव या भूमिकेला प्रेक्षकांनी खूपच जास्त पसंत केले होते. त्यानंतर त्याने ‘काय पो छे’ या हिंदी सिनेमामधून बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते. त्याचे खुप सारे चित्रपट हीट झाले होते. दिल बेचारा हा त्याचा शेवटचा सिनेमा होता.
सुशांतची खुप सारी स्वप्ने आणि ईच्छा अपूर्ण राहिल्या. त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याला अजून खुप सारी मेहनत करायची होती. 50 Dreams अशी त्याच्या स्वप्नांची लिस्ट होती. त्यातील 13 स्वप्ने त्याची पूर्ण झाली होती, 37 स्वप्ने त्याची अपूर्णच राहिली.
त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती , सारा अली खान, कृती सेनन यांनी सुशांतला आठवण करत सोशल मीडिया वर फोटो पोस्ट केले आहेत. त्याची बहीण श्वेता सिंग कीर्ती भावाच्या आठवणीत खुप भावुक झाली. काही आठवणी शेअर करत #SushantIsAlive असा हॅशटॅग तिने लिहिला आहे.
सुशांत आजही आठवणीमध्ये जीवंत आहे. त्याचं काम, त्याची बुद्धिमत्ता खूपच छान होती. आजही तो कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात आहे.