पॉवर कपल अंकिता लोखंडे-विकी जैन यांचं नव्या घरातलं एक वर्ष !

होम स्वीट होम ! अभिनेत्री अंकिता लोखंडे ने तिच्या घरा बद्दल लिहिली खास पोस्ट ! अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी त्यांच्या नव्या घरात साजर केलं एक वर्ष!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

घर हे नेहमीच सगळ्यांसाठी खास जागा असते. प्रत्येकाला त्याचं घर हे तितकच खास असत फक्त चार भिंती नसून अनेक भावना आणि माणसाची लगबग असलेली ही खास जागा असते. नुकतंच अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या या खास घरातलं एक वर्ष साजर केलं. अंकिताने तिच्या सोशल मीडिया वर तिच्या नवऱ्या सोबत फोटो शेअर केला आणि खास कॅप्शन दिले, “आमच्या आनंदी जागे मधल खास एक वर्ष ! वेळ हा अगदीच पटकन निघून जातो.

मला अजूनही आठवतंय  जेव्हा तू आमच्यासाठी हे घर विकत घेतलंस तेव्हा तू किती उत्साही आणि आनंदी होतास कारण हे आमचे मुंबईतील पहिले घर होते. आणि शेवटी ज्या दिवशी आम्ही शिफ्ट झालो आहाहा!! किती सुंदर आणि संस्मरणीय होता तो दिवस. ते 10-06-22 होते आणि काल आम्ही आमच्या आनंदी जागेचे एक वर्ष पूर्ण केले . संपूर्ण वर्ष !!! खूप भावना आणि खूप सुंदर भावना आणि खूप प्रेम आणि आठवणी असलेला हा रोलर कोस्टर आहे.. जेव्हा मी आमचे घर पाहते तेव्हा मला खूप कृतज्ञ वाटते…

म्हणून धन्यवाद मला आमचे घर दिल्याबद्दल ज्याला आम्ही आमचे आनंदी ठिकाण म्हणतो ! प्रिय घर .

Leave a Comment